दुर्गभ्रमंती: माझा प्राण (Trekking: My Passion)

माझे केवळ दैवतच नव्हे, तर प्राण! (Ch. Shivaji Maharaj is not just my God; he is ‘my soul’!)

ट्रेकिंगचा शब्दशः अर्थ जरी दुर्गभ्रमंती नसला तरी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जन्मलेल्या कोणत्याही नशीबवान मावळ्याचे ट्रेकिंग स्वराज्यातील दुर्गभ्रमंतीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही...म्हणून माझ्यासाठी ट्रेकिंग म्हणजे दुर्गभ्रमंतीच!
(Although trekking doesn't literally mean just climbing the forts, anyone who is lucky enough to have been born in Chhatrapati Shivaji Maharaj's Swarajya would agree that trekking here in Maharashtra wouldn't complete without climbing the forts here! So, for me, trekking is climbing and roaming on the historically important forts.)

ट्रेकिंग म्हणजे केवळ दगडधोंड्यांत भटकणे नव्हे!
(Trekking is not just wandering in the rocks!)

ट्रेकिंग म्हणजे रोमहर्षक क्षण (thrill)!
(Trekking is a thrill!)

ट्रेकिंग म्हणजे इतिहासाचा जाज्ज्वल्य अभिमान!
(Trekking is the pride of history!)

ट्रेकिंग म्हणजे भूगोलाचा अभ्यास!
(Trekking means studying Geography!)

ट्रेकिंग म्हणजे कला आणि ट्रेकिंग म्हणजे शास्त्र!
(Trekking is an art and trekking means science!)

ट्रेकिंग म्हणजे निसर्गाच्या शुद्ध आणि मुक्त उधळणीची अनुभूती!
(Trekking is an experience of the nature's purity and abundance!)

ट्रेकिंग म्हणजे स्वतःच्या शारीरिक सामर्थ्याची जाणिव!
(Trekking is knowing about our own physical strength!)

ट्रेकिंग म्हणजे स्वतःच्या मानसिक कणखरपणाची कसोटी!
(Trekking is the test of our own mental strength!)

ट्रेकिंग म्हणजे प्रसंगावधान अन् अखंड सावधानता!
(Trekking incorporates the presence of mind and complete alertness!)

ट्रेकिंग म्हणजे पंचज्ञानेंद्रियांचा सर्वोच्च वापर!
(Trekking is the highest use of five senses!)

ट्रेकिंग म्हणजे परस्परांतील पराकोटीच्या सहकार्याची परीक्षा!
(Trekking tests the quality of an interactive mutual support!)

ट्रेकिंग म्हणजे एकमेकांवर डोळे झाकून ठेवलेला विश्वास!
(Trekking means trusting one another blindly!)

ट्रेकिंग म्हणजे नि:स्वार्थीपणाचा कळस!
(Trekking is the Pinnacle of selfishness!)

ट्रेकिंग म्हणजे यशोशिखरावर पोहोचण्याआधीचा खडतर पण हवाहवासा वाटणारा प्रवास!
(Trekking is a tough but coveted journey before reaching the destination!)

ट्रेकिंग म्हणजे खडतर प्रवासानंतर सर्वोच्च ध्येयाचा टप्पा गाठण्याच्या क्षणाचा परमानंद!
(Trekking incorporates the ecstasy of achieving the highest goal after the toughest journey!)

ट्रेकिंग म्हणजे निरामय जीवन जगण्याची गुरुकिल्ली!
(Trekking is the key to living a disease-free life!)

ट्रेकिंग म्हणजे आत्मविश्वास अन् ट्रेकिंग म्हणजे आत्मज्ञान!
(Trekking pours self confidence...trekking means enlightenment!)

ट्रेकिंग म्हणजे 'शिवछत्रपती' आणि ट्रेकिंग म्हणजे 'छावा संभाजी'! (Trekking means ‘Shiv-Chhatrapati’ and trekking means ‘Chhava Sambhaji’!)

ट्रेकिंग म्हणजे मला नव्यानेच गवसलेला 'मी'!!!
(Trekking means newly found ‘ME’!!!)


स्वराज्याच्या शिरपेचातील मानाचा तुरा...रायगड! (The jewel in the crown of the Swarajya...Raigad!)

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस.)
(© Dr. Amit Suman Tukaram Patil,
M. B. B. S.)


Comments

  1. ट्रेकिंग बद्दल केलेलं विश्लेषण अप्रतिम....

    खूप छान आहे ब्लाँग...

    तुझा ब्लाँग वाचून मलाही थोडसं सुचलं..

    ट्रेकिंग म्हणजे मनाला लागलेली हूरहूर /मनाला लागलेला एक दुर्गभ्रमंतीचा ध्यास.

    ट्रेकिंग म्हणजे शिवछत्रपती आणि शंभूराजांची आठवण...

    ट्रेकिंग म्हणजे शिवछत्रपती आणि शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सह्याद्रीला वंदन...

    ट्रेकिंग म्हणजे तना-मनाला आलेली मरगळ घालवण्याचा अद्भत छंद

    ट्रेकिंग म्हणजे एक अनोखा उत्साह ��.

    ट्रेकिंग म्हणजे रोजच्या धावपळीच्या जीवनातून मिळालेला सुखद एकांत...☺��

    ट्रेकिंग म्हणजे रविवार ची ओढ.����

    ट्रेकिंग म्हणजे किल्ल्याच्या पायथ्यापासून माथ्यापर्यँत केलेल्या पायपिटीनंतर मिळालेल्या वार्‍याची थंड आल्हादायक झुळूक....


    Keep it up
    God bless you...with lot of energy.
    Best of Luck .

    Ramesh

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

“उदमांजर, भेरली माड आणि माझी भटकंती!” (Palm civet, Fishtail palm and my wanderings!)

रानफुले (भाग ३; कलानिधीगड, पारगड आणि गंधर्वगड ट्रेक) The Wild Flowers (Part III, Kalanidhigad, Pargad and Gandharvgad Trek) (Flowers found in Sahyadris)

रानफुले (भाग १; पावनगड ट्रेक); The Wild Flowers (Part I, Pavangad Trek) (Flowers found in Sahyadris)