रानफुले (भाग १; पावनगड ट्रेक); The Wild Flowers (Part I, Pavangad Trek) (Flowers found in Sahyadris)

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
(© Dr. Amit Suman Tukaram Patil)

२०१८ सालची माझी ट्रेकिंगची मोहिम कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील ‘पावनगडा’वरील भ्रमंतीने चालू झाली. पन्हाळा या ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण गडापासून अवघ्या ३ किमी अंतरावर असूनही हा पावनगड मात्र उपेक्षितच राहिला आहे. परंतु, इतिहासात आणि त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात या गडाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या गडाबद्दल पुढे मी लिहिणार आहेच. तत्पूर्वी, ज्याप्रमाणे आपण एखाद्या चांगल्या गोष्टींचे स्वागत पुष्पार्पणाने करतो, त्याप्रमाणे या ब्लॉगचे स्वागत पावनगडावर आढळलेल्या काही रानफुलांच्या प्रसन्न दर्शनाने करूया.

My trekking campaign for the year 2018 started with the ‘Pavangad’ fort climb in Panhala tehsil of Kolhapur district. The Pavangad fort remains highly neglected despite it being located at a distance of just 3 Km from the historically very important fort Panhala. However, this fort had a strategically very important role in the history in general and the history of Chhatrapati Shivaji Maharaj's Swarajya in specific. I'm going to write about this fort soon.
However, just as we welcome all the good things with the garland of flowers, let's start reading this new blog with a pleasing look at some of the flowers found on fort Pavangad!

“ज्यांना फुले पहायची आहेत त्यांना ती सर्वत्र दिसतात!” असे हेन्री मॅटिसने म्हटलेलेच आहे.
(There are always flowers for those who want to see them! - Henri Matisse)


पावनगडाच्या दिशेने जाण्यासाठी कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावरील वाघबीळ या ठिकाणापासून डावीकडे वळावे लागते!
To travel towards the fort Pavangad, one needs to take a left turn from Waghbeel (13 km away from Kolhapur) on Kolhapur-Ratnagiri road.


छोटे, पण सुंदर!
Tiny, yet beautiful!


“बी म्हणजे पकडून ठेवलेला आनंद आणि फूल म्हणजे तोच आनंद...सर्वांबरोबर वाटलेला!” (जॉन हॅरिगन)
Happiness held is the seed; Happiness shared is the flower. (John Harrigan)


“माती जेव्हा हसते, तेव्हा फुले उमलतात!” (राल्फ इमर्सन)
The earth laughs in flowers! (Ralph Emerson)


“जेव्हा आकारापेक्षा सौंदर्य जास्त आकर्षक असते!” (डॉ. अमित)
When the beauty is more attractive than the size! (Dr. Amit)



“शेकडो फुले बहरू देत...”(माओ झेडाँग)
Let a hundred flowers bloom...(Mao Zedong)



“मी कोण आहे? फूल की फळ?” (कोऽहम्?) (डॉ. अमित)
“Who am I? A flower or a fruit?” (Dr. Amit)



“एक लाजरा न् साजरा मुखडा चंद्रावाणी खुलला गं...” (प्रसिद्ध मराठी चित्रपटगीताचा मुखडा)
 A blushed and charming face is shining like a moon does...(A popular Marathi film song)



“फूल खिले हैं लिखा हुआ है तोड़ो मत, और मचल कर जी कहता है छोड़ो मत!” (अमीक़ हनफ़ी)
The flowers are bloomed, and they warn not to pluck them...but, my  sulking heart doesn't accept to let it go! (Ameek Hanafi)


“फूल ख़ुद अपने हुस्न में गुम है!” (वसीम बरेलवी)
The flower is lost in her beauty itself! (Wasim Bareilavi)


“गाणारा गुलाब किंवा पुटपुटणारे जांभळे फूल किंवा हळू आवाजात गुंजन करणारी फुले जर असती, तर किती दुर्मीळ आणि सुंदर चमत्कार घडून आला असता!” (एच. डब्ल्यू. बीचर)
A singing Rose, a whispering VIOLET, a murmuring honeysuckle, - oh, what a rate and exquisite miracle would these be! (H. W. Beecher)


चिमुकल्या फुलाने विचारले, “हे सूर्यदेवा, मी तुझी आराधना कशी करू आणि तुला कशा प्रकारे गीत गाऊ?” सूर्याने उत्तर दिले, “हे फुला, तुझ्या मूकपणातच तुझी आराधना आणि तुझे गीत सामावलेले आहे.” (रवींद्रनाथ टागोर)
“How may I sing to thee and worship, O sun?” asked the little flower. “By the simple silence of thy purity,” answered the sun. (Rabindranath Tagore)


“हर फूल है हवाओं के रुख़ पर खिला हुआ, और मैं हूँ अपने ख़्वाब के अंदर खिला हुआ!” (आफ़ताब हुसैन)
Every flower is bloomed in the direction of a breeze, and I'm blossomed inside my dreams! (Aftab Hussain)


“फूल का अपना कोई रंग कोई रूप नहीं...” (क़तील शिपाई)
The flower does neither have the colour nor the form...(Quateel Shifaai) 


“शिद्दत से बहारों के इंतेज़ार में सब हैं…”
Everyone is waiting eagerly for the full blossom...



“या अखंड विश्वात मी सर्वाधिक आनंदी जीव असेन! मी शेकडो फुलांना स्पर्श करेन आणि तोडणार मात्र एकही नाही!” (एड्ना सेंट व्हिन्सेंट मिले)
I'll be the gladdest thing under the sun! I will touch a hundred flowers and not pick one. (Edna St. Vincent Millay)



“शेकडो फुले उमलतात पण ती कोणी पाहतही नाही, त्यांची मधुरता कोरड्या वाऱ्यावर वाया जाते.” (ग्रे)
Full many a flower is born to blush unseen, And waste its sweetness on the desert air. (Gray)


“डोंगरातील त्या जांभळाईने पाषाणांना(ही) भेदले आहे!” (टेन्नेस्सी विल्यम्स, कॅमिनो रिअल)
The violets in the mountains have broken the rocks! (Tennessee Williams, Camino Real)


मावळतीचा संधिप्रकाश हा केवळ एक भ्रम आहे; कारण सूर्याचे अस्तित्व तर कायमच असते...फक्त क्षितिजाच्या वर की क्षितिजाच्या खाली इतकाच काय तो फरक! (निकोलस स्पार्क)
Dusk is just an illusion because the sun is either above the horizon or below it! (Nicholas Spark)


ठीकाय तर मग, मित्रांनो...भेटूया लवकरच पुढच्या आणखी एका अशाच प्रसन्न ब्लॉगद्वारे.
Okay friends, let's meet at the earliest through the next blog.

धन्यवाद!
Thank you!

Comments

Popular posts from this blog

“उदमांजर, भेरली माड आणि माझी भटकंती!” (Palm civet, Fishtail palm and my wanderings!)

रानफुले (भाग ३; कलानिधीगड, पारगड आणि गंधर्वगड ट्रेक) The Wild Flowers (Part III, Kalanidhigad, Pargad and Gandharvgad Trek) (Flowers found in Sahyadris)