रानफुले (भाग ३; कलानिधीगड, पारगड आणि गंधर्वगड ट्रेक) The Wild Flowers (Part III, Kalanidhigad, Pargad and Gandharvgad Trek) (Flowers found in Sahyadris)

रानफुले (भाग ३; कलानिधीगड, पारगड आणि गंधर्वगड ट्रेक)
The Wild Flowers (Part III, Kalanidhigad, Pargad and Gandharvgad Trek) (Flowers found in Sahyadris)

२७ जानेवारीला महिपालगड आणि कलानिधीगड येथे दुर्गभ्रमंती केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता मी महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पारगडावर ट्रेकिंगला जायचे निश्चित केले. त्याच दिवशी येताना चंदगड-गडहिंग्लज रस्त्यावरील गंधर्वगडावर मी ट्रेकिंग केले. या ट्रेकिंगदरम्यान कलानिधीगड आणि पारगडावर मला बरीच रानफुले आढळली. सह्याद्रीच्या कुशीत आढळणारी ही जैवविविधता कुणाही दर्दी रसिकाने हेवा करावा अशीच आहे!

After trekking on Mahipalgad and Kalanidhigad on 27th January, I finalised to leave my Kolhapur home at 4.30 a.m. on a beautiful dawn of 28th January to trek on  Pargad, the fort that is strategically situated on Maharashtra-Goa border. On the same day, while returning back, I trekked on Gandharvgad lying besides Chandgad-Gadhinglaj road. I came across many beautiful wildflowers on both the forts viz. Kalanidhigad and Pargad. Any passionate traveller (including trekkers) would always envy the immense biodiversity present in Sahyadri's laps.

रानफुलांच्या माझ्या या मालिकेमधील हा शेवटचा लेख आहे. अजूनही आपल्या आसपास आढळणाऱ्या बऱ्याच फुलांची छायाचित्रे मी टिपली आहेत. त्यांचे फोटो मी यथावकाश आणखीन काही ब्लॉगमधून प्रसिद्ध करीनच. तूर्तास या रानफुलांच्या दर्शनाने मन प्रसन्न करूया.

This is the last article in my series on wildflowers. I have still photographed a lot many flowers found around us. I'll publish those photos through some of my subsequent blogs. Till then, get delighted with the beautiful and fresh looks of these flowers...

तुमच्या प्रतिपादनाबरोबर फुले असू द्या, या पॅट्रिक एफ. ओकेफे यांच्या सल्ल्याचा मान राखून...
As Patrick F. O.’Keefe has advised, I'm ‛saying’ it with flowers...


(टीप- या किंवा याआधीच्या दोन ब्लॉगमधील फुलांची नावे बिनचूक माहिती असल्यास तज्ज्ञांनी/माहितगारांनी जरूर कळवावीत.)
(N. B.- If any expert reader knows the exact names of wildflowers published in this blog or previous two blogs, please revert back with the same.)

१/1

जगात जर फुलेच नसती तर हे जग किती ओसड व भयाण जागा झाले असते...
(सौ. बाल्फोर)

What a desolate place would be a world without flowers?
(Mrs. Balfour)

२/2

ही रंगीबेरंगी फुले मला त्यांच्या अप्रतिम सौंदर्याने लाजवतात,
ती मला मी भुंगा नसल्याबद्दल पश्चात्तापदग्ध करतात!
(एमिली डिकिन्सन, १८६४)

The lovely flowers embarrass me,
They make me regret I'm not a bee!!!
(Emily Dickinson, 1864)

३/3

छोटे असो वा मोठे, फूल हे फूलच असते.
(डॉ. स्यूस यांच्या एका वाक्यात नकळत बदल करून...)

A flower is a flower, no matter how small.
(Modified from one of Dr. Seuss’ sayings)

४/4

मैंने कहा फूलों से हँसो तो वो खिलखिलाके हँस दिये;
और ये कहा जीवन है भाई मेरे हँसने के लिये।
(गीतकार- योगेश, फिल्म- मिली [१९७५])

I asked flowers to smile, and they replied with the big laugh on their face;
They further made me aware that, the life should mean happiness!
(Lyrics- Yogesh, a song from Film Milli [1975])

५/5

चाह नहीं सम्राटों के शव पर हे हरि डाला जाऊँ,
चाह नहीं देवों के सिर पर चढूँ भाग्य पर इठलाऊँ।
(माखनलाल चतुर्वेदी की कविता ‛पुष्प की अभिलाषा’ में से उद्धृत)

I do not aspire, O Lord, that I adorn the funeral wreath on an emperor's corpse
Nor do I aspire that I mount the crown of the Gods and swagger on my fortune
(From Makhanlal Chaturvedi's poem ‛Pushp ki Abhilasha’ [The desire of a flower]

६/6

प्रत्येक फूल म्हणजे निसर्गात उमलत जाणारा एक आत्मा असतो.
(जेरार्ड नेरवल)

Every flower is a soul blossoming in nature.
(Gerard Nerval)

७/7

What is this season, in which the flowers have become like the hearts and are blooming,
All the colours are dissolving, all the fragrances are dissolving.
(Lyrics by Javed Akhtar, a popular song from the film ‛Dil Chahata Hain’)

कैसी है ये रुत के जिस में फूल बन के दिल खिलें,
घुल रहें हैं रंग सारे, घुल रहीं हैं खुशबुएँ।
(जावेद अख्तर लिखित ‛दिल चाहता है’ फ़ीचर फ़िल्म का मशहूर गीत)

८/8

जर तुम्हाला खूप महान गोष्टी करणे शक्य नसेल, तर तुम्ही करू इच्छिणाऱ्या छोट्या गोष्टी महानतेने करा!
(नेपोलियन हिल)

If you cannot do great things, do small things in a great way!
(Napoleon Hill)

९/9

ती म्हणजे एक रानफूल आहे
ती एका भरपूर सूर्यप्रकाश असणाऱ्या आनंदी दिवशी वाट पाहतेय
ती बदलाचे वारे वाहण्याची वाट पाहतेय
ती म्हणजे एक धगधगता निखारा आहे, जो केवळ एका छोट्याशा ठिणगीच्या शोधात आहे,
आणि हो,
ती स्वतःच्या वाढीसाठी एका सुयोग्य जागेच्या शोधात आहे...
ती म्हणजे जणू एक रानफूल आहे...
(‛पॉइंट अॉफ ग्रेस’ संगीत संच)

She is a wildflower
That's waiting on a sunny day
Waitin' on the winds of change to blow
Just a red hot spark that's looking for a little flame, yeah
Trying to find the perfect place to grow
She is a wildflower
(From the music album- ‛Point of Grace’)




१०/10

अश्रूही जेथे खोलपर्यंत पोहचू शकत नाहीत असा विचार मला एखादे बारकेसे उमललेले फूल देऊ करते.
(वर्ड्सवर्थ)

To me the meanest flower that blows can give thoughts that do often lie too deep for tears.
(Wordsworth)

११/11

लहान असताना प्रत्येक गोष्ट अतिशय गोंडसच दिसते.
(सिंथिया रौले)

Everything looks cute when it's small.
(Cynthia Rowley)

१२/12

फुले...‛सौंदर्याची एक तिरीप ही जगातील सर्व ऐहिक गोष्टींना पुरून उरते’ याची सुखद खात्री करून देतात.
(राल्फ एमर्सन)

Flowers...are the proud assertion that a ray of beauty outvalues all the utilities of the world.
(Ralph W. Emerson)

१३/13

परमेश्वराने सुंदर फुलांच्या द्वारे जणू आपले विचारच कोरले आहेत!
(थिओडोर पार्कर)

The God has inscribed his thoughts in these marvellous hieroglyphics in the form of flowers!
(Theodore Parker)

१४ (अ)/14 (A)

मी एक रानफूल आहे.
आणि मला माझ्या वाढीसाठी थोड्याशा पावसाची गरज आहे...
आणि माझे रंग उजळवण्यासाठी मला थोडासा सूर्यप्रकाश हवा आहे...
मी एक रानफूल आहे...
(डियाना कार्टर)

I am a wildflower.
And I need a little rain to grow...
A little sun to help my colors show...
I am a wildflower...
(Deana Carter)

१४ (ब)/14 (B)

वरील १४ (अ) या छायाचित्रात दाखवलेला भाग हा प्रत्यक्षात एवढ्या मोठ्या फुलाच्या टोकाचा भाग आहे. खरोखर निसर्गाची लीला अगाध आहे!

The photograph shown in 14 (A) above is actually a top of this very long flower. The nature's creations are simply awesome and its depth unfathomable!

१५/15

फुले ही परमेश्वराच्या सौंदर्याच्या आणि नैतिकतेच्या विचाराप्रमाणे असतात.
(विल्बरफोर्स)
Flowers are God’s thoughts of beauty taking form to gladden moral gaze.
(Wilberforce)

१६/16

She is a freshly bloomed flower,
And everyone has gone crazy for her.
(A beautiful song from the feature film ‛Kaho na pyaar hain’)

ताजा ताजा कली खिली है,
हम उसके दीवाने है।
(फ़ीचर फिल्म ‛कहो ना प्यार है’ का एक मशहूर गाना)

१७/17

नववधू प्रिया मी बावरते,
लाजते, पुढे सरते, फिरते
(गीतकार- भा. रा. तांबे)

O my beloved dear, perplexed that I'm newly married,
I'm blushed, I walk around, I keep moving on with grace...
(Lyrics- B. R. Tambe)


१८/18

प्रामाणिक रहा, चांगली व्यक्ती बना.
तण नको, फूल बना...
(अॅरॉन नेव्हिल)

Be honest, be nice.
Be a flower, not a weed.
(Aaron Neville)

१९/19

सुंदर फुले म्हणजे परमेश्वराच्या उत्तम गुणांनी केलेले जणू हास्यच असते!
(विल्बरफोर्स)

Lovely flowers are the smiles of God’s goodness!
(Wilberforce)

२०/20

नवजात पिंपळपान..!

A newborn pipal-leaf...!

💐💐💐💐💐💐💐

दुर्गभ्रमंतीदरम्यान अनपेक्षितपणे माझ्या सामोरी आलेली ही रानफुले! आपल्या सौंदर्याने समोरच्या प्रत्येकाला प्रसन्नचित्त करून त्याच्या अंगीही आपला टवटवीतपणा अलगदपणे उतरवणारे हे रानफूलरुपी चैतन्यच जणू!! निसर्ग काय आणि किती गोष्टी आपल्याला भरभरून देतो, नाही का? फक्त आपण आपल्या पंचेंद्रियांवर थोडासा ताण द्यायचा अवकाश की, निसर्ग आपल्याजवळचा हा खजिना आपल्यासमोर इतका रिता करतो की, भरून घेणाऱ्याची ओंजळ कमी पडावी!!!

Very unexpectedly did I come across these wildflowers, while I was on trek! With their sheer beauty and freshness, these wildflowers make us delighted and inspire liveliness!! What and how much joys does this nature bestow on us? No sooner do we put some stress on our five senses than did this nature give us everything that it has, in multiples of handfuls!!!

टॉम पेटीने आपल्या एका प्रसिद्ध अल्बममध्ये आपल्या प्रेयसीचे वर्णन करताना म्हटले आहे...
“तू रानफुलांमध्ये वास करतेस,
तुझ्या चिंता आणि अडचणींपासून दूर
तू माझ्याजवळच कुठेतरी आहेस,
तू जिथे स्वच्छंदी राहशील अशाच कोणत्यातरी ठिकाणी तू आहेस,
तू रानफुलांमध्येच कुठेतरी आहेस...”

Look, how does Tom Petty describe the whereabouts of his ladylove...
“You belong among the wildflowers
You belong somewhere close to me
Far away from your trouble and worries
You belong somewhere you feel free”

फुले पहा, फुले वाचवा, फुलांचा आनंद घ्या; कारण नेपोलियनने म्हटल्याप्रमाणे ‛जेथे फुले नष्ट होतात तेथे माणूस जगू शकत नाही!’

Look gently at flowers, save them, inspire ourselves with their freshness; because as Napoleon has rightly remarked, ‛where flowers degenerate, man cannot live!’
-------
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
(© Dr. Amit Suman Tukaram Patil)
-------

लेखकाच्या लेखी परवानगीशिवाय हा लेख संपूर्णतः किंवा अंशात्मक स्वरुपात कोणत्याही माध्यमाद्वारे प्रसिद्ध करता येणार नाही. कृपया लेखाचा अस्सलपणा टिकवण्यासाठी वाचकांनी नेहमीप्रमाणे सहकार्य करावे.

This article cannot be published in full or in parts by any means whatsoever without the written permission of this author. All readers are expected to cooperate as always with this author in keeping the authenticity of this article intact.
-------

धन्यवाद!

Thanking you all!
---------------------


Comments

Popular posts from this blog

“उदमांजर, भेरली माड आणि माझी भटकंती!” (Palm civet, Fishtail palm and my wanderings!)

रानफुले (भाग १; पावनगड ट्रेक); The Wild Flowers (Part I, Pavangad Trek) (Flowers found in Sahyadris)