रानफुले (भाग २; कलानिधीगड आणि पारगड ट्रेक) The Wild Flowers (Part II, Kalanidhigad and Pargad Trek) (Flowers found in Sahyadris)

रानफुले (भाग २; कलानिधीगड आणि पारगड ट्रेक)
The Wild Flowers (Part II, Kalanidhigad and Pargad Trek) (Flowers found in Sahyadris)

【© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील】
【© Dr. Amit Suman Tukaram Patil】

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १३ लहानमोठे गडकिल्ले आहेत. दि. १४ जानेवारीला पावनगडावर जाऊन आल्यानंतर मी ‛पुढचा ट्रेक कोणता करावा यावर स्वतःच्या मनाशी बराच खल केला’. योगायोगाने मला दि. २६, २७ आणि २८ जानेवारीला सुट्टी मिळाली...आणि, सच्चा ट्रेकर अशी संधी कधीच वाया जाऊ देत नाही!

There are 13 fortresses in all, of various sizes in Kolhapur district of Maharashtra. After trekking on Pavangad fort on 14th January, 2018, I had to do a great deal of thinking while deciding about the next possible trek. Incidentally I got holidays on 26th, 27th and 28th Jan. And, the hardcore trekker never lets slip such an opportunity out of his hands! 

मी दि. २७ आणि २८ जानेवारी, २०१८ या दोन दिवसांत चंदगड भागातील चार गडांवर ट्रेकिंग करायचे निश्चित केले. त्यानुसार मी २७ तारखेला महिपालगड आणि कलानिधीगड; आणि २८ तारखेला पारगड आणि गंधर्वगड असे ट्रेक पूर्ण केले. या गडांबद्दल पुढे ब्लॉगवर लिहीनच. तूर्तास या गडांवर सापडलेली काही सुंदर रानफुले पाहू.
चला तर मग, सुरुवात करूया...

I decided to trek on total of 4 forts on two days viz. 27 and 28 Jan. Accordingly, I visited Mahipalgad and Kalanidhigad on 27th January and trekked on Pargad and Gandharvgad on the very next day, i. e. 28th Jan. I'll write about the treks on these forums forts in details in my forthcoming blog. Meanwhile, let's make our mood with the look at some of these beautiful wildflowers found on these forts.
Let's start...

(टीप- यांतील बऱ्याच रानफुलांची नावे मला माहिती नाहीत. तज्ज्ञांची ती जरूर कळवावीत. धन्यवाद!)
(N. B. - I'm unaware of the names of most of these wildflowers. Experts do please revert back with the exact names. Thanking you all!)

१/1

छत्रपतींचा स्वराज्यसूर्य शेजारच्या कर्नाटकावर आपली प्रभा फाकवताना!
The Chhatrapati Shivaji's ‛Sun of own soil’ spreading its blaze on the land of neighbouring Karnataka!

२/2

चंदगडमधील गडांवर जाण्यासाठी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागतो ज्यातील बव्हंशी प्रवास कर्नाटक राज्य हद्दीतून होतो. निपाणी १३ किमी.वर असल्याचे दर्शविणारा हा फलक...
One needs to travel mostly on the Karnataka patch of the Pune-Bangalore national highway during the journey towards four forts in Chandgad taluka. A milestone suggesting Nippani to be 13 Kms away from this spot...

३/3

‛दैवी‛प्रकाशा’ची’ अनुभूती!
The patches of ‛God‛light’’!

४/4

फुलांशिवाय ही पृथ्वी हास्य नसलेल्या चेहऱ्यासारखी दिसली असती!
(क्लॅरा बाल्फोर)
The world without the flowers would be a face without a smile!
(Clara Balfour)

५/5

एक छोटेसे फूल निर्माण करावयाचे म्हटले तर त्याला शेकडो वर्षे राबावे लागते.
(विल्यम ब्लेक)
To create a little flower is the labour of ages.
(William Blake)

६/6

एखाद्या उद्यानाची जोपासना करणे हे परमेश्वराच्या जोडीने चालण्यासारखे असते...
(बोव्हे)
To cultivate a garden is to walk with the God...
(Bovee)

७/7

फुले आपल्याला खुणावत असतील, पण ती स्वर्गाशी आणि परमेश्वराशी बोलतात!!!
(हेन्री वॉर्ड बीचर)
Flowers may beckon towards us, but they speak towards heaven and God!!!
(Henry Ward Beecher)

८/8


फुले म्हणजे पृथ्वीवर उतरलेले आकाशातील तारेच नव्हेत काय?
(क्लॅरा बाल्फोर)
Are not the flowers stars of heaven?
(Clara Balfour)



९/9

एका फुलाचा हार बनविता येत नाही (म्हणून हा गुच्छ)!
(जॉर्ज हर्बर्ट)
One flower makes no garland (that's why this bunch is there)!
(George Herbert)

१०/10

मुलांनो, त्या टेकडीच्या पायथ्याशी लवकर जाऊ या...तेथे वृक्षावरील फुलांना बहर आला आहे आणि ती फुले वाऱ्यावर डोलत आहेत...
(रोओक्वान)
Children, let us off to the hillside now...To see the blossoms at their play...
(Ryokwan)

११/11

हम फूलों ने सीखा खिलना, हँसना और हँसाना, मन्द पवन पर झूम-झूमकर डाली पर इतराना।
(निरंकार देव द्वारा १९७४ में लिखा गया बालगीत)
We flowers have learnt the art of blossoming, laughing ourselves and making others laugh, to move with the branch in the breeze in an exulted mood.
(A nursery rhyme penned by Nirankar Dev in 1974)

१२/12

शेकडो फुले उमलतात; पण ती कोणी पाहतही नाही. त्यांची मधुरता कोरड्या वाऱ्यावर वाया जाते.
(ग्रे)
Full many a flower is born to blush unseen; and, waste its sweetness on the desert air.
(Gray)

१३ (१,२)/13 (1,2)

फुले म्हणजे प्रेमाची खरीखुरी भाषा असते!
(पार्क बेंजामिन)
Flowers are the truest language of love!
(Park Benjamin)


१४ (१,२,३)/14 (1,2,3)







परमेश्वराने निर्माण केलेल्या मधुर गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे फुले; पण परमेश्वर त्या फुलात आत्मा घालायला विसरला.
(एच. डब्ल्यू. बीचर)
Flowers are the sweetest things that God ever made and forgot to put a soul into.
(H. W. Beecher)

१५/15

फुले म्हणजे असे शब्द आहेत की जे लहान बाळालाही समजतात.
(बिशप कॉक्से)
Flowers are words which even a babe may understand.
(Bishop Coxe)

१६/16

परमेश्वराला महान साम्राज्याचाही कंटाळा येतो; पण चिमुकल्या फुलांचा कधीही कंटाळा येत नाही!!!
(रवींद्रनाथ टागोर)
The God grows weary of great kingdoms; but never of little flowers!!!
(Rabindranath Tagore)

१७/17

फार थोड्या फुलांचे रुपांतर फळात होते आणि त्यातील अगदी विरळ फळे पिकून परिपक्व होतात.
(गटे)
How few flowers yield any fruit and the fruit itself, how rarely does it ripen!
(Goethe)

१८/18

जीवनाचे पुष्प म्हणजे भ्रम आहे; अशी अनेक फुले कोमेजून जातात आणि त्यांची कोणतीच खूण मागे राहत नाही.
(गटे)
The flowers of life are but illusions. How many fade away and leave no trace.
(Goethe)

वेळात वेळ काढून ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे आभार!
Thank you all readers for taking some time out of your busy schedules to visit my blog!

【© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील】
【© Dr. Amit Suman Tukaram Patil】



Comments

  1. कालाय तस्मैय नमः
    काळ कधी कुणला केव्हा या पुर्थ्वी तलावरून अचानक आपल्यातून घेऊन जाईल हे सांगता येत नाही. याचे सुरेख वर्णन या लेखातून मंडले आहे अतिशय उत्तम लेख आहे
    वर्तमान जीवन सुखाने जागा 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

“उदमांजर, भेरली माड आणि माझी भटकंती!” (Palm civet, Fishtail palm and my wanderings!)

रानफुले (भाग ३; कलानिधीगड, पारगड आणि गंधर्वगड ट्रेक) The Wild Flowers (Part III, Kalanidhigad, Pargad and Gandharvgad Trek) (Flowers found in Sahyadris)

रानफुले (भाग १; पावनगड ट्रेक); The Wild Flowers (Part I, Pavangad Trek) (Flowers found in Sahyadris)