Posts

Showing posts from May, 2018

“उदमांजर, भेरली माड आणि माझी भटकंती!” (Palm civet, Fishtail palm and my wanderings!)

Image
“उदमांजर, भेरली माड आणि माझी भटकंती!” (Palm civet, Fishtail Palm and my wanderings!)) (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील) मी दुर्गभ्रमंतीदरम्यान आढळलेल्या वेगवेगळ्या विशेष गोष्टींबद्दल जेव्हा माझ्या ब्लॉगवर काही माहिती देतो, तेव्हा ती वाचल्यानंतर मला अशा स्वरुपाचे बरेच संदेश (मेसेज) येतात की, “सर, आम्हीही तिथे गेलो होतो; पण तुम्ही ज्या गोष्टीबद्दल तुमच्या लेखात लिहिलंय ती काही आम्हाला तिथे दिसली नाही. तुम्हालाच कशा काय सापडतात अशा गोष्टी?” मेसेज वाचला की काय उत्तर द्यावे ते मला कळत नाही. ‛मी प्रत्येक ठिकाणी सखोल पूर्वाभ्यास करूनच मग फिरायला जातो,’ असे मी सांगतो (ही आत्मप्रौढी नाही!); पण हे काही पूर्ण उत्तर नव्हे! कधीकधी एखाद्या गोष्टीचा खूप पाठपुरावा करावा लागतो (उदा. पन्हाळगडावरील ‛महादेव आप्पाचा डबरा’ शोधण्यासाठी घेतलेला ध्यास...), तर कधीकधी अगदी अनपेक्षितपणे एखादी गोष्ट दिसते (‛दिसणारी’ गोष्ट ‛पाहता येण्या’ची ‛नजर’ प्रयत्नाने विकसित करावी लागते ही गोष्ट वेगळी!)! आज मी ज्याबद्दल लिहिणार आहे ती काही फार दुर्मीळ गोष्ट नाही, मात्र तरीही हा ब्लॉग वाचणाऱ्या शेकड्यातील किमान नव्वद लोका