Posts

“उदमांजर, भेरली माड आणि माझी भटकंती!” (Palm civet, Fishtail palm and my wanderings!)

Image
“उदमांजर, भेरली माड आणि माझी भटकंती!” (Palm civet, Fishtail Palm and my wanderings!)) (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील) मी दुर्गभ्रमंतीदरम्यान आढळलेल्या वेगवेगळ्या विशेष गोष्टींबद्दल जेव्हा माझ्या ब्लॉगवर काही माहिती देतो, तेव्हा ती वाचल्यानंतर मला अशा स्वरुपाचे बरेच संदेश (मेसेज) येतात की, “सर, आम्हीही तिथे गेलो होतो; पण तुम्ही ज्या गोष्टीबद्दल तुमच्या लेखात लिहिलंय ती काही आम्हाला तिथे दिसली नाही. तुम्हालाच कशा काय सापडतात अशा गोष्टी?” मेसेज वाचला की काय उत्तर द्यावे ते मला कळत नाही. ‛मी प्रत्येक ठिकाणी सखोल पूर्वाभ्यास करूनच मग फिरायला जातो,’ असे मी सांगतो (ही आत्मप्रौढी नाही!); पण हे काही पूर्ण उत्तर नव्हे! कधीकधी एखाद्या गोष्टीचा खूप पाठपुरावा करावा लागतो (उदा. पन्हाळगडावरील ‛महादेव आप्पाचा डबरा’ शोधण्यासाठी घेतलेला ध्यास...), तर कधीकधी अगदी अनपेक्षितपणे एखादी गोष्ट दिसते (‛दिसणारी’ गोष्ट ‛पाहता येण्या’ची ‛नजर’ प्रयत्नाने विकसित करावी लागते ही गोष्ट वेगळी!)! आज मी ज्याबद्दल लिहिणार आहे ती काही फार दुर्मीळ गोष्ट नाही, मात्र तरीही हा ब्लॉग वाचणाऱ्या शेकड्यातील किमान नव्वद लोका...

व्यवस्थित न पाहिलेला पन्हाळा: हनुमान शिल्प आणि वैशिष्ट्यपूर्ण ‛महादेव आप्पाचा डबरा (कुंड)’/ Unseen Fort Panhala: Lord Hanuman Sculpture and Mahadeo Appa's Vessel (small well)

Image
व्यवस्थित न पाहिलेला पन्हाळा: हनुमान शिल्प आणि वैशिष्ट्यपूर्ण ‛महादेव आप्पाचा डबरा (कुंड)’ (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील) (www.trekdoctoramit.blogspot.com) कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड हा पौराणिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा किल्ला आहे. पन्हाळा हा किल्ला बनण्याअगोदर ब्रह्मगिरी ¹ या नावाने ओळखला जात असे. पराशर ऋषींनी येथे आश्रम स्थापल्यामुळे या परिसराला पराशराश्रम ² असेही म्हणत. पुढे नागवंशीय लोक पराशरांना शरण आल्यामुळे त्यांनी येथे वास्तव्य केले, ज्यामुळे पन्हाळ्याला पन्नगालय ³ असेही म्हटले जाऊ लागले. इ. स. ११९० मध्ये शिलाहार राजांनी त्यांच्या राज्याची राजधानी पन्हाळ्याला आणली. (सन ११८७ मध्ये शिलाहार राजवटीची राजधानी वाळवा येथे, नंतर कोल्हापूर येथे आणि शेवटी पन्हाळ्याला होती.) अफजलखान वधानंतर १८ व्या दिवशी म्हणजे २८ नोव्हेंबर, १६५९ रोजी शिवरायांनी पन्हाळा जिंकला. २० सप्टेंबर, १६६० रोजी महाराजांनी आदिलशहाशी केलेल्या तहात या गडाचा ताबा आदिलशहा सल्तनतीकडे गेला. १६६६ मध्ये औरंगजेबाच्या बाजूने लढताना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला सुलतानढवा अयशस्वी होऊन महाराजांचा परा...

रानफुले (भाग ३; कलानिधीगड, पारगड आणि गंधर्वगड ट्रेक) The Wild Flowers (Part III, Kalanidhigad, Pargad and Gandharvgad Trek) (Flowers found in Sahyadris)

Image
रानफुले (भाग ३; कलानिधीगड, पारगड आणि गंधर्वगड ट्रेक) The Wild Flowers (Part III, Kalanidhigad, Pargad and Gandharvgad Trek) (Flowers found in Sahyadris) २७ जानेवारीला महिपालगड आणि कलानिधीगड येथे दुर्गभ्रमंती केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता मी महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पारगडावर ट्रेकिंगला जायचे निश्चित केले. त्याच दिवशी येताना चंदगड-गडहिंग्लज रस्त्यावरील गंधर्वगडावर मी ट्रेकिंग केले. या ट्रेकिंगदरम्यान कलानिधीगड आणि पारगडावर मला बरीच रानफुले आढळली. सह्याद्रीच्या कुशीत आढळणारी ही जैवविविधता कुणाही दर्दी रसिकाने हेवा करावा अशीच आहे! After trekking on Mahipalgad and Kalanidhigad on 27th January, I finalised to leave my Kolhapur home at 4.30 a.m. on a beautiful dawn of 28th January to trek on  Pargad, the fort that is strategically situated on Maharashtra-Goa border. On the same day, while returning back, I trekked on Gandharvgad lying besides Chandgad-Gadhinglaj road. I came across many beautiful wildflowers on both the forts viz. Kalanidhigad and Pargad. Any passio...

रानफुले (भाग २; कलानिधीगड आणि पारगड ट्रेक) The Wild Flowers (Part II, Kalanidhigad and Pargad Trek) (Flowers found in Sahyadris)

Image
रानफुले (भाग २; कलानिधीगड आणि पारगड ट्रेक) The Wild Flowers (Part II, Kalanidhigad and Pargad Trek) (Flowers found in Sahyadris) 【© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील】 【© Dr. Amit Suman Tukaram Patil】 कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १३ लहानमोठे गडकिल्ले आहेत. दि. १४ जानेवारीला पावनगडावर जाऊन आल्यानंतर मी ‛पुढचा ट्रेक कोणता करावा यावर स्वतःच्या मनाशी बराच खल केला’. योगायोगाने मला दि. २६, २७ आणि २८ जानेवारीला सुट्टी मिळाली...आणि, सच्चा ट्रेकर अशी संधी कधीच वाया जाऊ देत नाही! There are 13 fortresses in all, of various sizes in Kolhapur district of Maharashtra. After trekking on Pavangad fort on 14th January, 2018, I had to do a great deal of thinking while deciding about the next possible trek. Incidentally I got holidays on 26th, 27th and 28th Jan. And, the hardcore trekker never lets slip such an opportunity out of his hands!  मी दि. २७ आणि २८ जानेवारी, २०१८ या दोन दिवसांत चंदगड भागातील चार गडांवर ट्रेकिंग करायचे निश्चित केले. त्यानुसार मी २७ तारखेला महिपालगड आणि कलानिधीगड; आणि...